Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

ITI Monthly Skills Competition

 

ITI Monthly Skills Competition

नमस्कार ITI Book घेऊन येत आहे ITI मधील सर्व ट्रेड साठी Monthly Skills Competition यामध्ये प्रत्येक महिन्यात ITI मधील प्रत्येक ट्रेड मधून एक प्रमाणे निवड केली जाईल व त्याला प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाईल. Monthly Skills Competition मध्ये भाग घेण्यासाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही हे पूर्णपणे मोफत असणार आहे. 


Monthly Skills Competition मध्ये भाग घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी प्रत्येक महिन्यात त्याने केलेले जॉब चे फोटो व जॉब ड्रॉईंग व प्रोसिजर माहिती त्याच्या ट्रेड च्या स्किल कॉम्पिटिशन वेबसाईट वर ई-मेल द्वारे पोस्ट अपलोड करेल, व या पोस्ट ला सर्व प्रशिक्षणार्थी व इन्स्ट्रक्टर व इतर कोणीही रेव्हिव मध्ये रेटिंग व १० पैकी मार्क देतील, रेव्हिव मध्ये मिळालेल्या रेटिंग व मार्क नुसार निवड केली जाईल. 


Monthly Skills Competition मध्ये भाग घेण्यासाठी खालील स्टेप्स प्रमाणे प्रोसेस करावी. 

 

Step - 1

तुम्ही केलेला जॉब एका पांढऱ्या  कागदावर ठेवून तुमच्या मोबाईल वर जॉब च्या सर्व बाजू दिसतील असे  दोन फोटो काढावे.


Step - 2

जॉब ड्रॉईंग व जॉब चे फोटो अपलोड करण्यासाठी लागणाऱ्या ई-मेल ऍड्रेस साठी खालील लिंक ओपन करून त्यावरील तुमचा ट्रेड च्या नावावर क्लिक करावे व ओपन होणाऱ्या तुमच्या ट्रेड च्या स्किल कॉम्पिटिशन वेबसाईट वर वरील बाजूस वेबसाईट च्या नावाच्या खाली ई-मेल ऍड्रेस आहे.


https://www.itibook.com/2024/08/skills-competition.html


 हा ई-मेल ऍड्रेस सेव करून ठेवावा.  कारण या ई-मेल ऍड्रेस वर प्रत्येक महिन्यात झालेले जॉब चे फोटो व जॉब ड्रॉईंग ची पोस्ट उपलोड करून पाठवायची आहे. 


Step - 3

तुमच्या मोबाईल वर जीमेल ओपन करावा व कंपोज वर क्लिक करून To च्या समोर  Step- 2 मध्ये मिळालेला ई-मेल ऍड्रेस लिहावा , नंतर त्या खाली Subject च्या समोर तुमचे नाव आडनाव व जॉब चे नाव लिहावे. नंतर त्या खाली Compose email मध्ये जॉब ची प्रोसिजर लिहावी.  नंतर सर्वात वर फाईल अटॅच बटन वर क्लिक करून Step- 1 नुसार काढलेले जॉब चे  फोटो अटॅच करावे व सेंड बटन दाबून ई-मेल सेंड करावा. ई-मेल सेंड केल्या नंतर थोड्या वेळा नंतर तुमच्या ट्रेड च्या स्किल कॉम्पिटिशन वेबसाईटवर तुमच्या जॉब ची पोस्ट लिंक तयार होईल ती खालील लिंक ओपन करून त्यावरील तुमचा ट्रेड च्या नावावर क्लिक करावे व ओपन होणाऱ्या तुमच्या ट्रेड च्या स्किल कॉम्पिटिशन वेबसाईट वर तुमच्या जॉब ची पोस्ट लिंक दिसेल. 


 https://www.itibook.com/2024/08/skills-competition.html


तुमच्या ट्रेड च्या स्किल कॉम्पिटिशन वेबसाईट वर तुमच्या जॉब ची पोस्ट लिंक कॉपी करण्यासाठी पोस्ट च्या खाली SHARE बटण दाबून Get link बटण दाबावे म्हणजे लिंक कॉपी होईल नंतर व्हाट्सअँप व इतर सर्व ठिकाणी पेस्ट करून शेअर करावी व इन्स्ट्रूक्टर, प्रशिक्षणार्थी व इतर सर्वाना जॉब पोस्ट पाहून पोस्ट च्या खाली रेव्हिव मध्ये 10 पैकी मार्क व रेव्हिव देण्यास सांगावे, या प्रमाणे प्रत्येक जॉब ची पोस्ट लिंक तयार करावी व शेअर करावी.




Comments