सन २०१८ नंतर अँप्रेन्टिस परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी अँप्रेन्टिसचे फायनल सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करावा
*सन २०१८ नंतर अँप्रेन्टिस परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी अँप्रेन्टिसचे फायनल सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करावा...*
(२०१८ आधीचे सर्टिफिकेट ऑनलाइन मिळत नाहीत.)
१. गुगल वर *ncvt.mis* सर्च करावे..
२. mis पोर्टल ओपन झाल्यावर *Trainee* वर क्लिक करावे. यानंतर त्यातुन *NAC Certificate Download* यावर क्लिक करावे.
३. यानंतर माहिती भरण्यासाठी रिक्त जागा येतील.
त्यात *Establishment code* टाकावा लागतो. ( हा कोड कॉन्ट्रॅक्ट फॉर्म वर असतो. उदा. E6162700401)
⬇️
*Date of birth* -- यात स्वतःची जन्मतारीख टाकावी..(जन्मतारीख टाकताना डायरेक्ट न टाकता शेजारी येणाऱ्या कॅलेंडर मधून तारीख शोधून जन्मतारीख टाकावी.)
⬇️
*Exam year* -- यात परीक्षा केव्हा दिली ते वर्ष टाकावे.
⬇️
*Apprentice Name* -- यात आपल्या मार्कलिस्ट वर नाव टाकावे. इथे नाव टाकत असताना आडनाव व आपले नाव टाकावे.
⬇️
सर्व माहिती भरून झाल्यावर सर्च वर क्लिक करावे.
*●(नाव टाकून सर्च होत नसल्यास नाव पुढे आडनाव मागे किंवा आडनाव पुढे नाव मागे लिहून पाहावे.)●*
⬇️
*सर्च झाल्यावर आपले नाव येईल त्यासमोर जाऊन सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्यावे👍🏻👍🏻👍🏻*
Comments
Post a Comment