*चला भारतीय संविधान समजून घेवूया!* संविधान उद्देशिका, पार्श्वभूमी व संविधान जागृतीसाठी सदर लेख आहे. आज देशात 72 वर्षानंतर ही संविधान बाबत जागृती पाहिजे त्याप्रमाणे झालेली नाही,असे वाटते. संविधान काहींनी डोळ्यांनी पाहिलेही असेलही. ज्यांनी पाहिले त्यांनी त्यास स्पर्श केलेला असेल.ज्यांनी स्पर्श केला त्यांनी ते वाचले, समजून घेतले का ? याबाबत खात्री देता येत नाही! संविधानाचा अभ्यास करून ते जगण्यात अंमल करणारे यांची संख्या निवडकच आहे. कारण वेगवेगळ्या जाती,धर्माची माणसे त्यांच्या धार्मिक ग्रंथ यांना पूजते! परंतु सर्व जाती,धर्म,भाषा,पंथ यांना देशाचा एकमेव ग्रंथ आचारनिय आहे,तो आहे *संविधान*. हे संविधान देशांतील सर्वात लहान संस्था गावपातळीवरील *ग्रामपंचायत* ते देशाची सर्वोच्च संस्था *संसद* , न्यायपालिका, प्रसारमाध्यमे यांच्यासह व्यक्तीच्या जीवनाला सविस्तर मार्गदर्शन करते. ज्या बंधू बहिणी यांनी संविधान वाचलं, समजलं ,अंगिकारले ते प्रगतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे माझी विनंती असेल की सर्वांनी निरपेक्ष भावनेने एकदा *संविधान*उद्देशिका* पहावं ,वाचावं ,समजून घ्यावं. कारण हे सर्व भारतीयांसाठी