Skip to main content

Translate

पुणे विभागाचा पंडित दीन दयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा दिनांक 14.3.2023रोजी सकाळी 10 वाजता देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉमर्स कॉलेज बिंदू चौक कोल्हापूर येथे

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या मा. मंत्री महोदय श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू युवक युवतींना खासगी कंपन्यामध्ये नोकरीची संधी रोजगार मेळाव्याच्या व्दारे देण्यात येते. असाच पुणे विभागाचा पंडित दीन दयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा दिनांक 14.3.2023रोजी सकाळी 10 वाजता देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉमर्स कॉलेज बिंदू चौक कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. पुणे व कोल्हापूर येथील अनेक नामांकित कंपन्या त्यांच्याकडील 10वी, 12वी, आय टी आय, डिप्लोमा, बी ई, अशा पात्रतेच्या पदांकरिता मुलाखती घेणार आहेत. तसेच ज्यांना उद्योग व्यवसाय करायचा आहे अशांसाठी शासनाची विविध महामंडळे योजनांची माहिती देण्यासाठी येणार आहेत तरी अधिकाधिक नोकरी ईच्छुक युवक युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा व विभागीय मेळाव्यास मोठ्या संख्येने कॉमर्स कॉलेज बिंदू चौक कोल्हापूर येथे उपस्थित राहावे असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय पुणे यांचे मार्फत करण्यात येत आहे.

Comments