Skip to main content

Translate

प्रत्येकाने एका लहान कामाला सुरूवात करा

प्रत्येकाने एका लहान कामाला सुरूवात करा. अगदी घरातील लहानांपासून ते थोरांपर्यंत कुणी पण सहज करू शकेल, पाण्याची बाटली सहज कोणालाही कुठे पण मिळून जाईल. प्रत्येक घरामध्ये दररोज कमीत कमी एक किंवा जास्त प्लास्टिक ची पिशव्या येतातच, (उदा. तेल पिशवी, दुध पिशवी, किराणा पिशवी, शैंपू, साबण, मॅगी, कुरकुरे, इ.) तिच पिशव्या आपल्याला कचऱ्या मध्ये न टाकता, दररोज पाण्याच्या बाटली मध्ये टाकायच्या आहेत. आठवड्यातून एकदा भरली कि ती बाटली व्यवस्थित टोपण लावून कचऱ्यात टाकू शकता. जेणेकरून विस्कटलेले प्लास्टिक जनावर खाणार नाहीत. प्लास्टिक कचऱ्याची आणि पाण्याच्या बाटलीची व्यवस्थित विल्हेवाट लागेल. कचरा विभागाला कचरा जमा करायला पण सोयीस्कर होईल. एवढ्या एका लहान कामातून पर्यावरण, पृथ्वी आणि येणाऱ्या पिढीला खुप मोठा फायदा होईल. हे काम प्रत्येकाने जमेल त्या वेळात, जमेल त्या पद्धतीने होता होईल तेवढे १००% करण्याचा प्रयत्न करा. शहरापासून ते गावातील प्रत्येक घरात हि चळवळ उभा राहण्याची काळाची गरज झाली आहे. हिच गरज ओळखून प्रत्येक घराने या शुभ कार्याला सुरूवात करावी हि नम्र विनंती.
*प्लास्टिक नियोजन युक्त भारत.*
प्लास्टिक चे नियोजन असे करा.

Comments