सोलापूर येथे पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा
सोलापूर : महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजापूर रोड, सोलापूर येथे सोमवार दिनांक १६ मार्च २०२६ रोजी पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात बारावी उत्तीर्ण, आयटीआय उत्तीर्ण तसेच पदविकाधारक आणि पदवीधारक उमेदवारांसाठी विविध प्रकारच्या रोजगार व शिकाऊ उमेदवारीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या भरती मेळाव्यात टाटा मोटर्स, थरमॅक्स, ओ.सी. स्पेशालिटी, लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रा. लि., प्रिसिजन कॅमशाफ्ट लि., किर्लोस्कर फेरस लि., लक्ष्मी ड्र्कन कॉम्पोनंट्स प्रा. लि., सोलापूर महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांसह अनेक नामांकित आस्थापनांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे उमेदवारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
स्थापत्य, यंत्र अभियांत्रिकी, संगणक, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिशियन, फॅब्रिकेशन, फाउंड्री आदी क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी या मेळाव्यात विशेष संधी उपलब्ध राहणार आहे.
हा भरती मेळावा सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत संस्थेच्या परिसरात आयोजित करण्यात आला असून पात्र उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपलब्ध रोजगार संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मनोज बिडकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment